Advertisement
हायलाइट्स:
- सिनेमाच्या प्रमोशनसाठी हृताने घेतला ब्रेक
- हृताची जागा घेणार ही अभिनेत्री
- 'अनन्या' आणि 'टाइमपास ३' लागोपाठ होणार प्रदर्शित
मुंबई: 'मन उडू उडू झालं' ही मालिका आणि 'दादा एक गुड न्यूज आहे' हे नाटक या दोन माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. अभिनेत्रीचा 'अनन्या' हा सिनेमा २२ जुलैला तर 'टाइमपास ३' हा सिनेमा या २९ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. छोट्या पडद्याद्वारे मोठी फॅन फॉलोइंग मिळवणाऱ्या हृताचे आता एक नव्हे दोन चित्रपट रांगेत आहेत. या दोन्ही सिनेमांसाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. अनन्याचा ट्रेलर तर टाइमपास ३ ची गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.