औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरेंची नवी खेळी; बंडखोर आमदाराला दणका देत दुसऱ्या नेत्यावर दिली महत्त्वाची जबाबदारी

KolhapurLive


 

Shivsena News : उद्धव ठाकरे यांनी तनवाणी यांना महत्त्वाचे पद दिल्याने येत्या काळात शहरात बंडखोर आमदारांचा गट आणि शिवसेना यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळू शकते.

औरंगाबाद : बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटात सामील झालेले शिवसेनेचे औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दणका दिला आहे. जैस्वाल यांची उद्धव ठाकरेंनी महानगरप्रमुख या पदावरून हकालपट्टी करत माजी आमदार किशनचंद तनवाणी यांना महानगरप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.


दरम्यान, मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तनवाणी यांना पक्षात महत्त्वाचे पद दिल्याने येत्या काळात बंडखोर आमदारांचा गट आणि शिवसेना यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळू शकते. कारण तनवाणी यांच्या पाठीमागे तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. त्यामुळे आगामी काळात औरंगाबादमध्ये नेमक्या काय राजकीय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.







पाहायला मिळू शकते.