कॉमनवेल्थ बॅडमिंटन पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारतीय जोडीनं इंग्लंडला नमवून सुवर्णपदकावर झडप घातलीय. भारताच्या सात्विकसाईराज रंकिरेड्डी आणि चिराग शेट्टीनं (Satwik Sairaj Rankireddy and Chirag Chandrashekhar Shetty) इंग्लंडच्या के बेन लेन आणि सीन वेन्डी यांचा 21-15, 21-13 असा पराभव केलाय. कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करून दाखवलंय. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 59 पदकं जिंकली आहेत. ज्यात 21 सुवर्ण, रौप्यपदक 15 आणि 23 कांस्यपदकांचा समावेश आहे.