Indian Sqaud for Asia Cup 2022 : जसप्रीत बुमराह आशिया चषक स्पर्धेत नाही खेळणार, समोर आलं मोठं कारण

KolhapurLive
Indian Sqaud for Asia Cup 2022 : विराट कोहली, लोकेश राहुल या स्टार फलंदाजांच्या पुनरागमनाची चाहूल चाहत्यांना लागली आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी BCCI आज संघ जाहीर करण्याची शक्यता आहे. अशात भारताला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) हा आशिया चषक ट्वेंटी-२० स्पर्धेत खेळणार नाही. त्याची पाठ दुखत आहे आणि त्याला त्यातून सावरण्यासाठी आणखी काही कालावधी हवा आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, परंतु PTI शी बोलताना BCCI च्या सूत्रांनी ही माहिती दिली.

 बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीतून सावरण्यासाठी दाखल होईल. सध्या तो  कुटुंबीयांसोबत फिरायला गेला आहे.  

आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक२७ ऑगस्ट - श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)२८ ऑगस्ट- भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)३० ऑगस्ट - बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, शाहजाह  ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)३१ ऑगस्ट - भारत विरुद्ध क्वालिफायर, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)१ सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)२ सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर, शाहजाह  ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)३ सप्टेंबर - B1 विरुद्ध B2, Super 4, शाहजाह ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)४ सप्टेंबर - A1 विरुद्ध A2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)६ सप्टेंबर - A1 विरुद्ध B1, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)७ सप्टेंबर - A2 विरुद्ध B2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)८ सप्टेंबर- A1 विरुद्ध B2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)९ सप्टेंबर - B1 विरुद्ध A2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)११ सप्टेंबर - अंतिम सामना, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)