कॅन्सर, हार्ट अटॅक, कोलेस्ट्रॉल, खराब पाचन यासारख्या भयंकर आजारांचा धोका कमी करते हे 1 फळ, खा व प्रोटेक्ट व्हा

KolhapurLive

 

What happens if we eat Mosambi daily : रोज मोसंबीचे सेवन केल्यास अनेक आजारांपासून संरक्षण मिळते. मात्र त्याचे अतिसेवन

 करणे कटाक्षाने टाळावे. जर एखाद्याला सिट्रीक अ‍ॅसिडची अ‍ॅलर्जी असेल तर मोसंबी त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकते.



मोसंबी (sweet lemon or mosambi) हे फळ तुम्हाला देखील माहित आहे. मोसंबीचा रस तर कित्येकांचा खूप आवडता सुद्धा असतो. तसं पाहिलं तर आपण मोसंबीकडे एक भारी चव असणारे गोड फळ म्हणूनच पाहतो. पण मोसंबी त्यापेक्षा सुद्धा खूप काही हे बरं का! हे फळ लिंबूवर्गीय फळांमध्ये येते म्हणून याला गोड लिंबू असे सुद्धा म्हणतात. मोसंबीचा आकार सुद्धा तुम्ही पाहिला तर काहीसा लिंबू सारखाच असतो.

तर या मोसंबीमध्ये अनेक पोषक तत्वे आणि व्हिटॅमिन्स असतात. यात आम्ल खूप कमी प्रमाणात असते. मोसंबीच्या एका फळामध्ये 50 मिलीग्रॅमपर्यंत व्हिटॅमिन 'सी' असते जे दैनिक आहाराच्या गरजेच्या जवळपास 22% आहे. हेल्थ एक्सपर्ट तर मोसंबीचे फळ किंवा मोसंबीचा ज्यूस रोज पिण्याचा सल्ला देतात. कारण हे फळ आरोग्याला सुद्धा खूप फायदेशीर आहे आणि म्हणूनच श्रीमंतांच्या घरात ब्रेकफास्टला मोसंबीचा रसच असतो.

कोणकोणते व्हिटॅमिन्स असतात?


आता तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की मोसंबीमध्ये खूप सारे व्हिटॅमिन्स असतात हे मान्य पण हे व्हिटॅमिन्स नक्की असतात कोणकोणते? चला जाणून घेऊया. व्हिटॅमिन सी सोबतच मोसंबीमध्ये व्हिटॅमिन 'ए', कॅल्शियम, कार्बोहाइड्रेट, फास्फरस, पोटॅशियम, फोलेट ही तत्वे असतात. याशिवाय फळामध्ये अँटीऑक्सीडेंट, अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, अँटी-ट्यूमर, अँटी-डायबिटिक, अँटी-अल्सर असे अनेक औषधी गुणधर्म सुद्धा असतात. फेमस न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्रा या मोसंबी खाण्याचे काही खास फायदे सांगितले आहेत आणि तेच आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्रा म्हणतात की मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. हे व्हिटॅमिन कॉलेजन नावाचे प्रोटीन बनवण्यासाठी आवश्यक असते. यामुळे त्वचा टाईट आणि मजबूत राहते. यशिवाय यातील अँटीऑक्सिडेंट गुणधर्म संबंधित त्वचा बदलांशी लढा देतात आणि त्वचेचे रक्षण करण्यात मदत करतात. यशिवाय हे चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स यांवर सुद्धा प्रभावी ठरतात. मोसंबीमध्ये असणारे अँटीऑक्सिडेंट आणि अँटीबायोटिक गुणधर्म त्वचेला संक्रमणापासून वाचवण्याचे सुद्धा काम करतात.

कॅन्सरचा धोका होतो कमी



मोसंबीमध्ये लिमोनॉइड्स नावाचे एक योगिक आढळते, जे काही प्रमाणात कॅन्सरचा धोका कमी करू शकते. एका रिसर्च पेपरमध्ये सांगितले की मोसंबीमध्ये आढळणारे अँटी-कॅन्सर गुणधर्म मुख्यत: लिव्हर कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि पोटातील ट्युमरच्या धोक्याला कमी करण्याचे काम करतात. तर मंडळी, हा मोसंबीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणायला पाहिजे. तुम्हाला सुद्धा कॅन्सरपासून स्वत:चा बचाव करायचा असेल आणि हेल्दी राहायचे असेल तर आवर्जून मोसंबी खा.


पचनसाठी फायद्याची हे मोसंबी



मोसंबीमध्ये फ्लेवोनॉइड्सची एक हाई-कंटेंट वॅल्यू असते जी पचन रस, अॅसिड आणि पित्ताच्या स्त्रावाला वाढवून पचन तंत्राला सक्रीय करते. अशावेळी पोटात तयार झाले आम्ल पाचक रसांना रोखून पचनात मदत करतात. आणि एवढेच नाही तर उत्सर्जन प्रणालीच्या माध्यमातून विषारी पदार्थ सुद्धा बाहेर फेकले जातात. जर तुम्हाला पचनाचा त्रास असेल तर आवर्जून मोसंबीचे सेवन करा. तुमच्या आसपास कोणाला पचन संबंधी समस्या असतील तर त्यांना देखील नक्की मोसंबी खायला सांगा.

होते कोलेस्ट्रॉल कंट्रोल



कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रित राखण्यासाठी सुद्धा मोसंबी खाण्याचा सल्ला जाणकार देतात. मोसंबीच्या ज्यूस मध्ये एंटी-हाइपरलिपिडेमिक म्हणजेच हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा प्रभाव असतो. अशावेळी रजर तुम्हो रोज मोसंबीचे सेवन केले तर शरीरातील कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रित राहू शकतो.


हे आहेत अन्य फायदे



वरील प्रमुख फायद्यांशिवाय मोसंबीचे अन्य फायदे देखील आहे. याशिवाय मोसंबी अनेक आजारांवर सुद्धा रामबाण समजले जाते. कावीळ, दमा, अर्थराइटिस यांसारख्या आजारांसाठी मोसंबीचे सेवन जरूर करावे. तसेच इम्युनिटी वाढवायची असेल तर त्यात सुद्धा मोसंबीचे फळ मदत करू शकते.

डिस्क्लेमर: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.