गडहिंग्लज :येथील नदाफ कॉलनीमध्ये नगरसेविका प्रा.सौ. बिनादेवी कुराडे यांच्या मार्फत पवित्र रमजान महिन्यानिमित्त प्रभाग चारमधील सर्व मुस्लीम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिक मिरासाहेब नदाफ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित इफ्तार पार्टी कार्यक्रमात प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रा.बी.एस.पठाण यांनी केले. यावेळी प्रभाग चार मधील सर्व नागरिकांच्या वतीने नगरसेविका प्रा.सौ. बिनादेवी कुराडे यांचा विशेष सत्कार ज्येष्ठ नागरिक सौ. मुमताज नदाफ यांच्या हस्ते करण्यात आला.
जमीर नदाफ, समीर नदाफ, जावेद बुडेखान, आरिफ पटेल, सरोज शेख, श्री उत्तम राऊत यांनी या इफ्तार पाटीसाठी विशेष नियोजन केले. यावेळी बोलताना नगरसेविका प्रा.सौ. बिनादेवी कुराडे यांनी या आपल्या सत्काराप्रसंगी बोलताना आपण सर्वांनी मला या प्रभागातील सेवा करण्याची संधी दिली. त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानणे हे माझ्या दृष्टीने माझे परम कर्तव्य आहे. या प्रभागातील सर्व कामे करण्याची त्यांनी ग्वाही दिली. यावेळी समाज बांधवांनी ऋण व्यक्त केले. यावेळी प्रा.विश्वजीत कुराडे, श्री कौसर मुल्लाणी, अॅड. संदीप फगरे, श्री बनसोडे सर यांच्यासह प्रभाग चारमधील सर्व मुस्लीम बंधू-भगिनी इफ्तार पार्टीसाठी उपस्थित होते. आभार प्रा. आझाद पटेल यांनी मानले.