गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयाचा एन.सी.सी.विभागाचा माजी सिनिअर अंडर ऑफिसर व खेळाडू महंमद मेहबूब कलगी याची भारतीय सैन्यदलात पॅराकमांडो 106 बटालियन निवड झाली. इंडियन आर्मी बेळगाव येथे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सैन्य भरतीत ही निवड झाली असून महंमद कलगी पुढील ट्रेनिंगसाठी बेंगलोर येथे रवाना होत आहे. या निवडीबद्दल शिवराज विद्यासंकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांच्या हस्ते सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
महंमद कलगी यांना संस्थेचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे, सचिव डॉ.अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, संचालक प्रा.विश्वजित कुराडे, प्रा.सौ.बिनादेवी कुराडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांचे प्रोत्साहन तर क्रीडा शिक्षक डॉ.राहुल मगदूम, प्रा.जयवंत पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिवराज महाविद्यालयाची भारतीय सेना तसेच पोलिस सेवेमध्ये विद्यार्थी निवड होण्याची परंपरा आजवर कायम राहिली आहे. या वर्षी ही परंपरा पुढे नेत महंमद मेहबूब कलगी यांनी आपल्या यशाची नवी नोंद केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.