शिवराज महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात संपन्न

KolhapurLive

गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात फिजिक्स विभाग यांच्या विद्यमाने आयोजित ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी शिवराज विद्या संकुलाचे संचालक प्रा.विश्वजीत कुराडे यांच्या हस्ते थोर शास्त्रज्ञ डॉ.सी.व्ही.रामन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी सायन्सच्या विद्यार्थ्यांनी ‘रिसेंट ट्रेंडस इन सायन्स’ या विषयावर तयार केलेले मॉडेल प्रेझेन्टेशनचे उद्घाटन प्रा.विश्वजीत कुराडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या व्याख्यानामध्ये हलकर्णी महाविद्यालयाचे प्रा.प्रदीप बोभाटे यांनी ‘भौतिकशास्त्रातील संशोधनाच्या ट्रेंडचा परिचय’या विषयावर मार्गदर्शनामध्ये विज्ञान हीच काळाची गरज का आहे. त्याचबरोबर विज्ञानाशिवाय तरणोपाय नाही. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन आत्मसात करावा. तसेच विज्ञानाच्या माध्यमातून आपल्या जीवनाची वाटचाल करावी तरच आपण खऱ्याअर्थी यशस्वी व्हाल असे प्रतिपादन प्रा.बोभाटे यांनी केले तसेच थोर शास्त्रज्ञ डॉ.सी.व्ही.रामन यांच्या वैज्ञानिक कार्याबाबत सखोल मार्गदर्शन केले. सद्याच्या जगात भौतिकशास्त्रातील नव-नव्या संधी कोणत्या आहेत याबाबत त्यांनी सविस्तर नार्ग्दर्शन केले. या कार्यक्रमात प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी मार्गदर्शन करताना यावर्षी ‘वुमेन इन सायन्स आणि विकसित भारत’ हे थीम याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘ऑनलाईन क्वीझ काँन्टेस्ट’ स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमास डॉ.विजय सावंत, प्रा.गौरव पाटील, प्रा.सायली गावडे, प्रा.कृष्णा पोवार यांच्यासह सर्व प्राध्यापक विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.सुशांत पांगम यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.केदार गुरव यांनी केले तर आभार प्रा.ऋतुजा शिंदे यांनी मानले.