शिवराज विद्या संकुलाच्या संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेज मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा संपन्न

KolhapurLive

गडहिंग्लज :येथील शिवराज विद्या संकुलाच्या संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा संपन्न झाल्या. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून योगशिक्षीका सौ.सुरेखा कळसगोंडा होत्या तर शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे व संचालिका प्रा. सौ. बिनादेवी कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. समन्वयक प्रा. पौर्णिमा कुराडे यांनी स्वागत करून प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. 

        या कार्यक्रमात प्रमुख अतिथी योगशिक्षिका सौ सुरेखा कळसगोंडा मॅडम यांनी आज धावपळीच्या जगात योगाची फार गरज आहे. आपण आपल्या आरोग्यासाठी रोज योगाच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. आपले आरोग्य सदृढ राहण्यासाठी योग हा उत्तम पर्याय आहे. योगाच्या माध्यमातून आपले शरीर तंदुरुस्त ठेवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांनी आजच्या महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाज परिवर्तनाचे कार्य जोमाने चालू ठेवावे. महाविद्यालयातील सुकन्या फोरमच्या माध्यमातून समाज ओरिएंटेड उपक्रम राबवून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा वारसा पुढे चालविणे गरजेचे आहे. या कार्यक्रमात प्रा. नूतन नगरसेविका प्रा. सौ बिनादेवी कुराडे यांचा व राष्ट्रीय योग स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविल्याबद्दल योगशिक्षिका सौ सुरेखा कळसगोंडा यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. सौ बिनादेवी कुराडे मॅडम, पर्यवेक्षक तानाजी चौगुले यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा, पाककला स्पर्धा, ग्रंथ परीक्षण, पारंपारिक वेशभूषा या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास विनाअनुदानीत ज्युनिअर विभागाचे प्रमुख प्रा. संदीप कुराडे यांच्यासह महाविद्यालयातील बहुसंख्या महिला प्राध्यापिका, प्रशासकीय महिला भगिनी, विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सीमा कांबळे, प्रा.पल्लवी कुंभार यांनी केले. 

स्पर्धेतील विजेते अनुक्रमे असे- 

निबंध स्पर्धा-श्रावणी आनंदा पोटे (अकरावी सायन्स), सोनाली परसराम डंगी (डी .एड.भाग 2), धैर्यलक्ष्मी राजगोंडा पाटील (अकरावी कॉमर्स), प्रतीक्षा भैरू म्हेत्री (अकरावी आर्ट्स), पाककला स्पर्धा- नंदिनी बसवराज गुंजाटी (अकरावीवी सायन्स), अनुष्का बाजीराव फराकटे (अकरावी कॉमर्स), श्रेया शिवानंद शेट्टी (अकरावी आर्ट्स),

ग्रंथ परीक्षण- मराठी भाषा - रेवती भानुदास बिडवे (एम.ए . भाग एक), शर्वरी विलास रोटे (बी.ए. भाग २), सोनाली रायगोंडा गवळी (एम. ए. भाग १), इंग्रजी भाषा- प्रतीक्षा बाबुराव गुरव (बी.ए. भाग एक), प्रणाली आनंदा सोलापूरे, साक्षी किरण पाटील बीए भाग दोन, वेदांती दत्तात्रेय पालकर (बी.ए. भाग एक), पारंपारिक वेशभूषा- श्रेया संदीप कोकितकर (अकरावी सायन्स), प्रणाली संजय चौगुले, साक्षी विजय पाटील, ऋतुजा संजय पाटील (बी.सी.एस. भाग 3) या सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.