गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात मराठी विभागाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस एम.कदम होते. तर शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रारंभी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ.एस.एम.कदम व प्रा.सौ.पौर्णिमा कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले यांनी केले.या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु.प्रगती गुरव हिने हुपरी येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल संस्था सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
मराठी भाषा दिनानिमित्त प्रमुख अतिथी म्हणून मनोगत व्यक्त करताना डॉ.रंगराव हेंडगे यांनी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी आपल्या साहित्यातून मानवी मूल्यांची कशी पेरणी केली आहे. त्याचबरोबर त्यांच्या साहित्यातून मानवतावाद, स्वाभिमान आणि देशप्रेम कसे ओथंबून वाहते असे स्पष्ट केले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी आपल्या मार्गदर्शनातून ‘मराठी भाषेचे महत्व’ सांगितले. विद्यार्थिनी कु.प्रगती गुरव हिने मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास शिवराज इंग्लिश मेडियम स्कूलचे प्राचार्य श्री ए.बी.पाटील, ग्रंथपाल श्री संदीप कुराडे, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. समन्वयक सूत्रसंचालन डॉ.अशोक मोरमारे यांनी केले तर डॉ.लोहिता माने यांनी आभार मानले.