गडहिंग्लज : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व येथील शिवराज महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शिवाजी विद्यापीठ झोनल पुरुष व महिला नेटबॉल’ स्पर्धेचे शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर उदघाटन शिवराज विद्या संकुलाचे संचालक प्रा विश्वजीत कुराडे सर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम हे होते. यावेळी पर्यवेक्षक तानाजी चौगुले, शिवराज इंग्लिश मीडियम चे प्राचार्य ए. बी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी उदघाटनाचा सामना शिवराज महाविद्यालय विरुद्ध घोडावत कन्या महाविद्यालय, जयसिंगपूर यांच्यात झाला. शिवराज महाविद्यालयाने तीन शून्य ने घोडावत महाविद्यालयाचा पराभव केला. या स्पर्धेसाठी शारीरिक शिक्षण संचालक डॉ. धनंजय पाटील, प्रा. सुनील पाटील, डॉ. विकास जाधव, डॉ. विक्रम नांगरे-पाटील, प्रा. रोहन आडनाईक, प्रा. गावडे, प्रा. गुंजीकर मॅडम आदी उपस्थित होते. या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी क्रीडा संचालक डॉ. राहुल मगदूम, प्रा. जयवंत पाटील, श्री किरण कावणेकर आदींसह प्रशासकीय कर्मचारी परिश्रम घेत आहेत.