अभिनव आय आय टी मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न.

KolhapurLive

 गडहिंग्लज ता.10 : अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशन मार्फत घेण्यात आलेल्या ' अभिनव टॅलेंट सर्च ' ( ए टी एस) २०२६ या स्कॉलरशिप परीक्षेतील अभिनव आय आय टी मेडीकल फाउंडेशनच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अभिनवच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. याप्रसंगी गडहिंग्लज तालुक्याचे तहसीलदार मा.श्री . ऋषीकेत शेळके यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. "यशस्वी होण्यासाठी शिस्तबद्ध नियोजनाची कास धरली पाहिजे त्यासोबतच योग्य तयारी आणि सादरीकरण या गोष्टींची आवश्यकता असते" असे विचार त्यांनी यावेळी मांडले.
        तहसीलदार मा.श्री. ऋषीकेत शेळके सरांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी काही महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले. आपल्याला आपल्या यशापासून रोखणारे दुसरे कोणी नसून आपले नकारात्मक विचार असतात. आयुष्यात मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी कष्ट, जिद्द, आत्मविश्वास आणि चिकाटीचे प्रयत्न महत्त्वाचे असतात. परीक्षा ही तुमच्या हुशारीची नसून मानसिकतेची आहे त्यासाठी एकदाच नियोजन न करता दररोज करायचे आहे. यावेळी शेळके सरांनी आपला MPSC परीक्षेतील प्रवास उलघडून सांगितला.

JEE आणि NEET परीक्षांवर विशेष भर
  आजच्या स्पर्धात्मक युगाचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी देखील IIT आणि NEET सारख्या परीक्षेची तयारी केली पाहिजे. अभिनवने ग्रामीण भागामध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिली आहे विद्यार्थ्यांनी या सुविधांचा आणि मार्गदर्शनाचा योग्य वापर करून स्वतःचे उज्ज्वल असे भवितव्य घडवावे.
           अभिनव फाउंडेशनच्या यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. अभिनव ग्रुप आॅफ एज्युकेशनचे अध्यक्ष डॉ. अमोल पाटील सर यांनी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त केले . या कार्यक्रमासाठी सचिव संतोष पाटील, प्राचार्य अभिजीत पाटील , प्रा.संदीप पाटील , प्रा.हेमंत संकपाळ , प्रा. जी. एस. शिंदे आणि सर्व शिक्षक उपस्थित होते. सुनील मार्तंड सर यांनी सूत्रसंचालन केले. शरद कांबळे सरांनी आभार व्यक्त केले.