Saturday Club Global Trust ही एक महाराष्ट्रीयन उद्योजग व व्यावसायिक यांची संस्था असून महाराष्ट्रीयन उद्योजकणा व्यवसाय वाढी साठी मदत करणे ह्या साठी काम करते. समाजहितासाठी विविध उपक्रम राबविण्यावरही तिचा विशेष भर असतो.
गडहिंग्लज शहरात Saturday Club Global Trust गडहिंग्लज चॅप्टर आणि गडहिंग्लज ट्रॅफिक पोलिस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हेल्मेट जनजागृती, सीट बेल्ट व रस्ता सुरक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये रस्ता व वाहतूक नियमांबाबत जनजागृती निर्माण करणे हा होता.
या वेळी PSI रमेश मोरे यांनी रस्ता व वाहतूक नियमांचे महत्त्व, सुरक्षित वाहनचालना, हेल्मेट व सीट बेल्ट वापराचे फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अश्वथामा रेडेकर, रेड ॲश हेल्मेट्सचे मालक, यांनी हेल्मेट वापर व रस्ता सुरक्षिततेबाबत विशेष मार्गदर्शन केले.
*Saturday क्लब गडहिंग्लज चॅप्टर चे चेअरपर्सन मुरारी चिकोडे व DYSP इंगवले साहेब यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सकाळी ९ वाजता रॅलीची सुरुवात करण्यात आली.*
ही रॅली रेड ॲश शोरूम → बस स्टँड → चर्च रोड → मुख्य रस्ता → पुन्हा रेड ॲश शोरूम या मार्गाने यशस्वीरीत्या पार पडली. रॅलीदरम्यान हेल्मेट वापर, सीट बेल्ट जनजागृती आणि रस्ता सुरक्षेचा महत्त्वपूर्ण संदेश समाजासमोर प्रभावीपणे पोहोचवण्यात आला.
*या उपक्रमासाठी Saturday Club चे सर्व सदस्य तसेच त्यांचा स्टाफ असे जवळपास 200 जण हेल्मेट परिधान करून bike घेऊन रॅली मध्ये सहभागी झाले होते.*
सुरक्षिततेचा संदेश समाजापर्यंत पोहचवण्यात आला.
ह्या रॅली साठी Saturday Club Global Trust (वेस्ट रिजन )चे रिजन हेड योगेश देशपांडे, डेप्युटी रिजन हेड जितेंद्र रनणवरे, PSI शिंदे साहेब, गडहिंग्लज चॅप्टर चे सचिव M.R. Patil, खजिनदार डॉ. मयुरेश शिंत्रे हे सर्व प्रामुख्याने उपस्थित होते. योगेश देशपांडे यांनी रॅली चा उद्देश सांगण्यासाठी मनोगत व्यक्त केले. डॉ.अमोल पाटील यांनी आभार म्हणाले.