गडहिंग्लज नगरपरिषद प्रभाग क्र. ०३ अ निवडणूक : नविद मुश्रीफ यांची मतदान केंद्रांना भेट

KolhapurLive

गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपरिषद प्रभाग क्र. ०३ अ च्या उमेदवार सौ.सुजाता संतोष मांगले यांच्या सार्वत्रिक निवडणूक-२०२५ अनुषंगाने आज गोकुळ दूध संघाचे चेअरमन व सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन नविद मुश्रीफ साहेब यांनी प्रभाग 03 अ येथील मतदान केंद्रांला भेटी दिली. यावेळी त्यांनी बूथवरील कार्यकर्त्यांशी संवाद साधत मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला.

मुश्रीफ साहेबांनी मतदान केंद्रांवरील परिस्थिती, मतदारांची उपस्थिती तसेच नागरिकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाची सविस्तर माहिती घेतली. निवडणूक प्रक्रियेत कार्यकर्त्यांनी दाखवलेले समर्पण, मेहनत व संघटनशक्ती पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. सर्व कार्यकर्त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांनी मनापासून अभिमान व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी अमर मांगले, गुंडू पाटील, महेश सलवादे, राहुल शिरकुळे, किरण कदम, सुरेश कोळकी, बाळासाहेब घुगरी, अमरनाथ घुगरी, महेश गाढवी, उदय परीट, प्रशांत शिंदे, अरुण शिंदे, शिवराज पाटील, संदीप पाटील, अजित पाटील, धनाजी कळेकर, उदय पाटील, महेश देवगोंडा, नरेंद्र भद्रापूर, बसवराज खणगावे, संतोष मांगले, तुषार वाटवे, रश्मीराज देसाई, चिंतामणी वाली, दयानंद पाटील, उदयराव जोशी, विनायक पाटील, गणेश जाधव, सुनील कदम आदींसह इतर प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.