मंत्र्यांना शेतकरी आत्महत्याचे काहीच सोय सुतक नाही

KolhapurLive

गडहिंग्लज : मंत्र्यांना शेतकरी आत्महत्याचे काहीच सोयर सुतक नाही. शेतकऱ्यांच्या वाढता आत्महत्या चिंताजनक आहेत शेतकऱ्यांना वेदनामुक्त जगण्यासाठी साहित्य संस्कृतीचे स्थान महत्त्वपूर्ण असते.आज समाजाला कोण वाली आहेत की नाही ? असे विचारणा करून शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कोण कारणीभूत आहे हे सांगण्याचे धाडस साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून होणे गरजेचे आहे. राजकीय लोकशाहीपेक्षा सांस्कृतिक लोकशाही निर्माण होणे काळाची गरज आहे असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उदघाटक डॉ.श्रीपाल सबनीस यांनी केले 

येथील शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. किसनराव कुराडे यांच्या ८१ व्या वाढदिवस वर्षाचे औचित्य साधून शिवराज विद्या संकुल, गडहिंग्लज आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्य संमेलनामध्ये साहित्य संमेलनात उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी द.म.सा.’च्या साहित्य संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ समीक्षक प्रा.अविनाश सप्रे होते. स्वागताध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा.किसनराव कुराडे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू व्ही.एन.शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. साहित्य संमेलनाची सुरुवात मान्यवरांच्या कुंडीतील रोपाला पाणी घालून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी दिवंगत ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, पन्नालाल सुराणा व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज चाकूरकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

प्रारंभी स्वागत प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी केले. प्रास्ताविक द.म.सा.चे कार्यकारिणी सदस्य विजय चोरमारे यांनी केले.

    यावेळी डॉ.श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले-खरा प्रश्न शेतकऱ्यांना वेदनामुक्त करण्याचा आहे. त्यांच्या वेदनामुक्तीसाठी अर्थशास्त्र समजून घेतले पाहिजे.स्वातंत्र्याचा सूर्य गरिबांच्या झोपडीपर्यंत पोहोचलेला नाही. लोकशाहीत दबाव निर्माण करणे योग्य नाही आणि समाजाने ते का स्वीकारावे हे थांबले पाहिजे यासाठी साहित्यिकांनी अन्याय-अत्याचारा विरुध्द लढणारे साहित्य निर्माण केले पाहिजे असे डॉ.सबनीस यांनी सांगितले. साहित्यातून माणसाचे माणूसपण जपणे आवश्यक आहे.माणूस दु:खमुक्त करणे ही तुमची आमची जबाबदारी आहे.

संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ समीक्षक प्रा. अविनाश सप्रे यांनी वाडमयाच्या संदर्भात मी घेऊ शकलो आणि त्याप्रमाणे मी थोडाफार लेखन वाडमय नियतकालिकातून करत आलो. मला असं वाटतं की कादंबरीकार, कथाकार, कवी यांच्या पार्श्वभूमीवर समीक्षक हा तर उपेक्षेचा प्राणी आहे. समीक्षक आहात म्हटलं की लोक चार पावलं तुमच्या पासून लांब राहतात. समीक्षकाबद्दल एक दुरून वावरणं हे एक अंतर ठेवणं हे असं एक घडत असतं. ज्या साहित्याचा विचार करतोय ते साहित्य समाजाच्या सर्व स्तरांमध्ये जातोय म्हणजे नेमकं काय होतंय, त्याची त्याची गुणवत्ता काय, कसला प्रकारचे साहित्य वाचलं जातंय हे सगळं प्रत्यक्ष भूमीवर बघण्याची संधी ही त्यातून मला मिळत गेली . अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याबद्दल चर्चा झाली याबद्दल एकमेकांचे आपण अभिनंदन करत राहिलो आणि आपल्याला असं लक्षात आलं की, अभिजात भाषेचा दर्जा आहे म्हणजे काय ते खूप जणांना माहिती नाही. मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही तर अतिशय आनंदाची अभिमानाची चांगली गोष्ट आहे पण ते सहजासहजी झालेलं नाही. हे मुद्दाम मला सांगितलं पाहिजे. जसा संयुक्त महाराष्ट्र आपणाला मराठी भाषिकांचा म्हणून सहजासहजी मिळाला नाही त्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. त्यासाठी खूप लढावं लागले. त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले खूप अडथळे आले आणि मग तो म्हणाला हीच गोष्ट मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यामध्ये घडलेली आहे.

           अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता आपल्याला मात्र तो ज्या वेळेला मिळाला असं आपण प्रयत्न सुरू केला त्या वेळेला खूप त्याचे होत गेली मग आपल्या साहित्य परिषदेला लाख लोकांच्या सह्या घेऊन त्या सरकारला पाठवावे लागल्या. आपल्याकडे आता अनुवादाला चांगलं स्थान मिळू लागलेला आहे. अनुवाद ही गोष्ट मराठीमध्ये दुर्लक्ष लिहिली होती. आता सुदैवानं आपण असं म्हणू की सध्या अनुवादाला चांगले दिवस आलेत आणि चांगल्या प्रकारात मराठीतील कादंबरी, कथा, कविता ही अनुवादित होऊन हिंदी किंवा अन्य भाषेमध्ये जाताना दिसते हे अत्यंत स्वागतार्ह आहे. महाराष्ट्रातल्या मराठी भाषेत लिहिलं जाणार साहित्य हे कसे आहे. किती आहे हे अन्य भाषिकांना कळणार नाही आणि म्हणून अनुवादाचं महत्त्व हे सुद्धा मला इथे आपणांसमोर मुद्दाम अधोरेखित करावसे वाटते. एक विजय तेंडुलकर यांच्या नाटककार जर सोडला आणि पूर्वी वि.स खांडेकर जर सोडले तर मराठी लेखक अन्य भाषिकांना जवळजवळ माहिती नव्हती. पण आता ते होऊ लागले म्हणून अनुवाद ही द्वैभाषिक लोकांसाठी अत्यंत महत्वाची गरज आहे. असेही ज्येष्ठ समीक्षक प्रा.सप्रे यांनी स्पष्ट केले.

या संमेलनाच्या व्यासपीठावरून त्यांनी अनुवाद ही गोष्ट अत्यंत गरजेची आहे आणि आपल्यापैकी जे जे म्हणून आहेहे अनुवादाच्या रूपातून मांडले पाहिजे. अनुवादाची गरज आज मोठ्या प्रमाणात आहे. अनुवाद हे अत्यंत महत्त्वाचे आहे. द्वैभाषिकांना अनुवादाची फारच गरज आहे. मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला एवढ्यावर समाधान न मानता मराठी भाषा ही उज्वल भविष्य काळामध्ये उज्वल व्हायचे असेल तर त्या दृष्टीने आपण काय प्रयत्न करणार आहोत हा खरा मुद्दा महत्वाचा आहे हे खरे आव्हान आहे. आज मराठीकडे दुर्लक्ष करत आहोत. चांगल्या मराठी शाळा बंद पडत आहे हे आपण मुद्दाम लक्षात घेतलं पाहिजे. चांगली मराठी नियतकालिका बंद पडत आहेत. आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

मराठी भाषेचा विकास दर व्हायचा असेल तर नुसते इतिहासाकडे न पाहता इथून पुढच्या काळामध्ये मराठी भाषा ही ज्ञानभाषा बनण्यासाठी ज्ञानाच्या सर्व क्षेत्रांमध्ये ती कशी जाईल असा प्रयत्न करणं फार मोलाचा आहे. मी सर्वत्र गेली पाहिजे म्हणजे ती विज्ञानात गेली पाहिजे ती वाणिज्य मध्ये गेली पाहिजे ती उद्योगात गेली पाहिजे साहित्यात तर आहेच आहे पुन्हा मला हे काय होतं की माहिती असणं गरजेचं आहे. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू व्ही.एन.शिंदे व स्वागताध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा. किसनराव कुराडे आदी मान्यवरांची भाषणे झाली.

या कार्यक्रमात परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ.अच्युत माने यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी ‘नवे शैक्षणिक धोरण’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी साहित्यिक पद्मश्री शिवचंद्र भाटीया, शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष श्री के.जी.पाटील. अॅड. दिग्विजय कुराडे, संस्थेचे एम.के.सुतार, के.बी.पेडणेकर, नंदनवाडे गुरुजी, प्रा. बीनादेवी कुराडे, संचालक प्रा. विश्वजीत कुराडे संस्थेचे अन्य पदाधिकारी, राजेंद्र गड्यानावर, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे कार्याध्यक्ष दि.बा.पाटील, कार्यवाह विनोद कांबळे, विक्रम राजवर्धन, दमसा साहित्य पत्रिकेचे संपादक डॉ.चंद्रकांत पोतदार, स्थानिक संयोजक श्री विलास माळी. दमसाचे अन्य पदाधिकारी, स्थानिक कमिटीचे सर्व पदाधिकारी, समन्वयक डॉ. अशोक मोरमारे, ग्रंथपाल श्री संदीप कुराडे, पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले, रेखा पोतदार, यांच्यासह नवोदित साहित्यिक, तालुका ग्रंथालय संघाचे पदाधिकारी, सदस्य, विविध प्रकाशन संस्थेचे पदाधिकारी या परिसरातील साहित्यिक, कवी, बहुसंख्य साहित्य रसिक, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सूत्रसंचालन डॉ.श्रद्धा पाटील, दिनकर खवरे, सुरेश दास, दीपा बंदी यांनी केले तर दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळूबुळू यांनी आभार मानले.