अभिनव सायन्स अकॅडमीची ‘ अभिनव टॅलेंट सर्च परीक्षा 2026 ’ उत्साहात संपन्न!

KolhapurLive

गडहिंग्लज दिनांक 23/12/2025 अभिनव सायन्स अकॅडमी गडहिंग्लज यांच्या वतीने घेण्यात आलेली अभिनव टॅलेंट सर्च परीक्षा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली या परीक्षेत इयत्ता दहावीतील 4500विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे गरीबातील गरीब विद्यार्थी देखील देशपातळीवर चमकला पाहिजे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून अभिनव सायन्स अकॅडमी ची स्थापना सन 2018 मध्ये डॉक्टर अमोल पाटील सर यांनी केली. अकॅडमीच्या स्थापनेपासून आजपर्यंत NEET,JEE,MHCET परीक्षांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी अद्भुतपूर्व यश संपादन केले आहे. अकॅडमीच्या स्थापनेपासूनच अभिनव टॅलेंट सर्च परीक्षा ही प्रत्येक वर्षी गणित विज्ञान व बुद्धिमत्ता या विषयांसाठी घेतली जाते यावर्षी गडहिंग्लज ,नेसरी, कोवाड ,नागनवाडी ,तुडये पाटणे फाटा, आजरा, सेनापती कापशी, मुरगुड, सरवडे ,गारगोटी, कडगाव अशा तब्बल 12 केंद्रावर घेण्यात आली. परीक्षेचे आयोजन शिस्तबद्ध व शांत वातावरणात करण्यात आले. या परीक्षेतील यश संपादन केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना 30 लाख रुपयापर्यंतची स्कॉलरशिप व एक लाख रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. पालकांनी व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. अशा स्पर्धात्मक परीक्षांमुळे विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता वाढीस लागते असे मत शिक्षकांनी देखील व्यक्त केले.