गडहिंग्लज : येथील शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छापर कार्यक्रमासाठी संकलित करण्यात आलेल्या वह्यांचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील जीवन शिक्षण विद्या वडरगे, विद्या मंदिर बड्याचीवाडी, गिजवणे हायस्कूल माळमारुती गिजवणे, हिरण्यकेशी विद्यालय हिरलगे, विद्या मंदिर लिंगनूर कसबा नूल, दादा देसाई हायस्कूल, गजानन विद्या मंदिर, शुभंकरोती प्री-प्रायमरी स्कूल इंचनाळ, महाराष्ट्र हायस्कूल अत्याळ, विद्या मंदिर बेळगुंदी, विद्या मंदिर जखेवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.
डॉ.एस.बी.माने यांच्या अधिपत्याखाली जयराज पाटील, जयंत माने (अत्याळ), मानसिंग यादव (हिरलगे), दीपक पाटील (इंचनाळ), सुभाना हजारे (वडरगे), उदय राऊत (गिजवणे), लता अजय कांबळे (बड्याचीवाडी) अनिकेत शिंदे (जखेवाडी) आदींनी संबधित शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी सर्व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.