शिवराज महाविद्यालयात मराठी विभागाच्यावतीने 'मराठी भाषा सप्ताहा'निमित्त प्रा. (डॉ.) गोपाळ गावडे (कोल्हापूर) यांचे 'अभिजात मराठी भाषा आणि साहित्य ' या विषयावरील व्याख्यान डॉ. जे. पी. नाईक सभागृहामध्ये संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते. मराठी विभाग प्रमुख डॉ.मनमोहन राजे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या कार्यक्रमात आपल्या मार्गदर्शनात डॉ. गोपाळ गावडे यांनी ‘मराठी भाषा ही प्राचीन भाषा असून तिची विविध रूपे आपणास पहावयास मिळतात तसेच मराठी भाषेच्या अनेक बोली असल्यामुळे ती अधिक समृद्ध आहे. मराठी भाषेचा समृद्ध वारसा टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आले. या सप्ताहा'निमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले होते.
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. किसनराव कुराडे यांच्या साहित्याचा कालानुक्रमे परिचय करून देणा-या डिजिटल फलकाचे उदघाटन तसेच भित्तीपत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धेचा अनुक्रमे निकाल असा
निबंधस्पर्धा - प्रथम -कु. संजना दीपक येणे (बी. कॉम. १) द्वितीय- कु. साक्षी संतोष सूर्यवंशी (बी. ए. २) तृतीय-कु. नवरत्न आनंद बिलावर (बी. कॉम २) उत्तेजनार्थ -कु. वेदांती दत्तात्रय पालकर (बी. ए. १), कु. साक्षी किरण पाटील (बी. ए. २) ,
सुंदर हस्ताक्षर स्पर्धा - प्रथम- कु. प्रतिक्षा जोतिबा भोसले ( बी. एस्सी. १), व्दितीय - कु. साक्षी किरण पाटील ( बी. ए. २ ) तृतीय-कु. प्रतिक्षा बाबूराव गुरव (बी. ए. १) , उत्तेजनार्थ - कु. आदिती अनिल देसाई (बी. कॉम. १) कु. प्रणाली आनंदा सोलापुरे (बी. ए. २) सर्व सहभागी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. होते. संस्थेचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला संस्थेच्या संचालिका प्रा. पौर्णिमा पाटील, डॉ. एस् डी. सावंत, डॉ. महेश चौगुले, पर्यवेक्षक प्रा तानाजी चौगुले, प्रा. शरद पाटील, प्रा. प्रियांका पाटील, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अशोक मोरमारे आणि डॉ. श्रद्धा पाटील यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ. लोहिता माने यांनी मानले.