शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये संशोधन कसे करावे या विषयावर मार्गदर्शन'बयो साईट रिसर्च सेंटर सांगली' व 'शिवराज कॉलेज ऑफ फार्मसी' मध्ये संशोधनाचा सामंजस्य करार'

KolhapurLive
गडहिंग्लज : येथील शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये 'संशोधन कसे करावे' या विषयावर बयो साईट रिसर्च सेंटर सांगलीचे संस्थापक डॉ. संदीप पाटील यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राहुल जाधव होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रा. शिवराज सडेकर यांनी केले.

बयो साईट रिसर्च सेंटर सांगलीचे संस्थापक डॉ. संदीप पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी संशोधन कसे करावे, संशोधनाचे अभ्यासामध्ये असणारे महत्व तसेच आजच्या काळात संशोधनातून स्वतःला सिध्द करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांनी संशोधनाची सुरुवात कशी होते. संशोधनामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका कशी असावी याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या विकासासाठी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे व सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली 'बयो साईट रिसर्च सेंटर सांगली' व 'शिवराज कॉलेज ऑफ फार्मसी' यांच्यामध्ये संशोधनाचा सामंजस्य करार करण्यात आला. या कार्यक्रमास फार्मसीचे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. शिवराज सडेकर यांनी केले. यावेळी फार्मसीचे बी. फार्मसीच्या तृतीय व अंतिम वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते.