शिवराज महाविद्यालयात ‘विद्यार्थी सहाय्यता जनजागृती अभियान’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

KolhapurLive

गडहिंग्लज : महाराष्ट्र शासन व शिवराज साहित्य, वाणिज्य आणि डी. एस. कदम विज्ञान महाविद्यालय गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विद्यार्थी सहाय्यता जनजागृती अभियान’ विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. शासनाच्या बार्टी, आर्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती आणि अमृत या संस्था मार्फत विद्यार्थी कल्याणासाठी विविध योजना राबविल्या जातात. त्या योजनांची परिपूर्ण माहिती व्हावी म्हणून आज शिवराज महाविद्यालयात विद्यार्थी सहायता जनजागृती अभियानांतर्गत एक दिवशी कार्यशाळा संपन्न झाली. या कार्य कार्यशाळेचे उदघाटन संस्था स्था सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते. कार्यशाळेच्या उदघाटनपर मनोगतात डॉ. अनिल कुराडे सर म्हणाले, की विद्यार्थ्यांनी शासन राबवत असलेल्या विविध योजनांचा लाभ घेणे गरजेचे आहे. शासन विविध योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करीत असते आणि यातूनच विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास साधला पाहिजे. शासन पुरवत असलेल्या स्कॉलरशिप सारख्या योजनेचा विद्यार्थ्यांनी फायदा घेतला पाहिजे. त्याच्यातूनच चांगले विद्यार्थी घडू शकतात. गडहिंग्लज तालुक्याचे तहसीलदार श्री. ऋषिकेत शेळके यांनी विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा फायदा करून घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध दाखल्यांची पूर्तता कशी करायची याविषयीचे अनमोल असे मार्गदर्शन करतानाच प्रत्येक 18 वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्याने मतदार नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. यातूनच आपली लोकशाही कशी बळकट होत जाते याविषयी अनमोल असे मार्गदर्शन केले. श्री. सचिन परब यांनी एम.पी.एस.सी.,यु.पी.एस.सी.,सेट-नेट, जेईई/नीट, स्टाफ सिलेक्शन,आय.बी.पी.एस., पी.एच.डी. अशा विविध परीक्षांसाठी महाराष्ट्र शासन सारथी, बार्टी, टीआरटीआय महाज्योती, अमृत, आर्टी अशा विविध स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आर्थिक मदत कशी करत असते. त्याचबरोबर या संस्थांमार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहितीही विद्यार्थ्यांना व्याख्यानातून श्री. सचिन परब यांनी करून दिली. यावेळी सारथी चे समन्वयक ऋषिकेश पाटील, गडहिंग्लज महसूल विभागातील मंडल अधिकारी श्री. राजेंद्र पाटील, तलाठी श्री. सचिन सावंत, महा-ई-सेवा केंद्राचे राहुल घबाडे, डॉ. मनमोहन राजे, प्रा.बाबासाहेब देसाई, श्री. नेताजी कांबळे उपस्थित होते. या कार्यशाळेत एकूण एकशे बारा विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अशोक मोरमारे यांनी केले. तर प्रा. डॉ. एस. डी. सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.