गडहिंग्लज : “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक प्रगतीसाठी केवळ शाळा व शिक्षक यांचे योगदान पुरेसे नसून पालकांचीही भूमिका अत्यंत महत्त्वाची असते,” असे प्रतिपादन डॉ. रविराज अहिरराव यांनी केले.
ते अभिनव ग्लोबल स्कूल व ज्युनिअर कॉलेज आयोजित पालक सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी पालकांनी केवळ गुणांवर लक्ष केंद्रित न करता मुलांच्या मानसिक, बौद्धिक व नैतिक विकासाकडेही लक्ष द्यावे, असे आवाहन केले. “मुलांमध्ये शिकण्याची आवड निर्माण होण्यासाठी घरचे वातावरण सकारात्मक असणे गरजेचे आहे. पालक व शिक्षक यांचा सातत्याने संवाद राहिल्यास मुलांच्या प्रगतीचा आलेख नक्कीच उंचावतो,” असेही त्यांनी नमूद केले.
माणूस हा पंचमहाभूतांनी बनला असून प्रसन्न वातावरणात प्रसन्न मानसिकता तयार होते आणि प्रसन्न मानसिकेत कार्य सिद्धीस जात असते यासाठीच घरचे वातावरण कसे असायला हवे याचे महत्त्व पटवून दिले
मेळाव्यात उपस्थित पालकांनी विविध प्रश्न विचारले. त्यांच्या शंकांचे निरसन करताना डॉ. अहिरराव यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ.अमोल पाटील सर यांनी करून दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीवनी मगदूम यांनी केले तर आभार सुप्रिया पाटील मॅडम यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती सॅटर्डे क्लब गडहिंग्लज चे चेअरमन मा. मुरारी चिकोडे , अतुल जाधव, सचिव संतोष पाटील,प्राचार्य अभिजीत पाटील यांचे सह सर्व स्टाफ व पालक उपस्थित होते.