गडहिंग्लज : गोकुळ दूध संघाचे चेअरमन श्री नविद मुश्रीफ यांनी आज गडहिंग्लज मधील सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन आरती केली. मंडळानी केलेल्या सजावटीचे व देखाव्याचे त्यांनी कौतुक केले.
राजा गडहिंग्लचा श्री हाळलक्ष्मी गणेशोत्सव मंडळ हे देखाव्यासाठी प्रसिद्ध मंडळ आहे. नविद मुश्रीफ यांनी मंडळाला भेट देताच ह्यावर्षीच्या देखाव्याचे काय नियोजन अशी आपुलकीने विचारपूस केली.
मंडळाचे ह्यावर्षीचे अध्यक्ष श्री अरुण शिंदे, संस्थापक अध्यक्ष श्री संदीप रोटे, कोल्हापूर लाईव्ह चे अभिजीत मांगले,भारतीय सैन्यदलातील नाईक सुभेदार अधिकारी संदीप पाटील (नेताजी), अमित मेंडुले, राहुल देवर्डे, युवराज आडावकर, प्रविण शिंदे, राहुल मोरे, अवधूत रोटे, विशाल रोटे यांच्यासह मंडळातील कार्यकर्त्यांनी जल्लोषात नविद मुश्रीफ यांचे स्वागत केले. ह्या प्रसंगी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख मंडळी देखील उपस्थित होते.