गडहिंग्लज : येथील शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये 'अँटी रैगिंग व व्यसनमुक्ती' या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांनी केले. गडहिंग्लज पोलीस ठाण्याचे ए.एस.आय.श्री विजय घाटगे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये आजची तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. तरुणाईने व्यसनापासून दूर राहणे आवश्यक आहे. आपल्या मित्राचा चांगला मित्र बना. चांगल्या गोष्टीतून व्यसनासारख्या वाईट गोष्टींना प्रतिबंध करत येणे शक्य आहे. मुलींनी आज काळात सक्षम व दक्ष राहिले पाहिजे. आपल्या मदतीसाठी ११२ या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधा तात्काळ मदत देण्यात येईल असे प्रतिपादन श्री घाटगे यांनी केले. अॅड. सदाशिव गुरव यांनी विद्यार्थ्यांना 'अँटी रॅगिंग'बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांनी अँटी रॅगिंग व व्यसनाबाबत थोडक्यात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास फार्मसीचे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. मनीषा जाधव व प्रा. सुप्रिया पन्हाळे यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. मनीषा जाधव यांनी केले.