प्रा. किसनराव कुराडे यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन

KolhapurLive
गडहिंग्लजःकोल्हापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ विचारवंत नेते, साहित्यिक प्रा. किसनराव यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आलेले आहे. सकाळी आठ ते दहा पर्यंत त्यांच्या मूळगावी ऐनापूर येथील विविध विकास कामांचा शुभारंभ, त्यानंतर सकाळी दहा ते दुपारी १२ पर्यंत शिवराज विद्या संकुलामध्ये या परिसरातील मान्यवरांचा गौरव समारंभ, महागांव येथे दुपारी १२ वाजता सहस्त्रचंद्र सोहळा तसेच सायंकाळी चार वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे माजी मंत्री कल्लाप्पाणा आवाडे दादा, माजी राज्यपाल डी. वाय. पाटील दादा, दै. पुढारीचे संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष श्री अशोकराव स्वामी वैगेरेसह जिल्ह्यातील शैक्षणिक, सहकार व साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव समारंभ प्रकाशकांच्या व विविध सामाजिक संस्थांच्यावतीने करण्यात येत आहे. या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.