गडहिंगलज येथील शिवराज कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये विदयार्थीनींसाठी आर्थिक साक्षरतेचे व्याख्यान हे महिला सक्षमीकरणाच्या हेतुने विकासित भारत या अभियाना अंर्तगत अॅडव्हार्जस ऑर्गनाजेशन यांच्या संयुक्त विदयमानाने आयोजित करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राहुल जाधव तसेच अॅडव्हार्जस ऑर्गनाजेशनतर्फे झाकीर हुसेन उपस्थित होते. ए. आय च्या जमान्यात होणारी आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी, आपल्याकडील पैशाचे योग्य नियोजन करण्यासाठी आर्थिक साक्षरता गरजेची असल्याचे प्रतिपादन झाकीर हुसेन यांनी केले. तसेच त्यांनी आर्थिक गुंतवणूक कशी, केव्हा, कोणातर्फे करावी याबद्दल सखोल माहिती दिली. या प्रसंगी बोलताना प्राचार्य जाधव सरांनी आर्थिक साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित केले. औषधनिर्मात्याला या ज्ञानाचा उपायोग स्वताचा व्यवसाय उभा करण्यासाठी व वृध्दींगत करण्यासाठी केला पाहिजे असे मत व्यक्त केले. या क्रार्यक्रमासाठी विदयार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्म चारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा मनिषा जाधव यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागामार्फत करण्यात आले .