येथील संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रा.किसनराव कुराडे यांच्या ८१ वा वाढदिवस व ऑगष्ट क्रांतीदिनानिमित्त देशभक्तीपर समूह गायन स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत प्रथम क्रमांक बारावी सायन्स ‘अ’ – व्दितीय- बारावी सायन्स ‘क’ तृतीय विभागून– अकरावी सायन्स ‘ब’ व बारावी कॉमर्स आदी विजेते ठरले. या विजेत्यांना वीरपत्नी सुरेखा पांडुरंग इळके, रुपाली प्रवीण माळी, मालुताई सुभाष इंगळे, शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष अॅड.दिग्विजय कुराडे, संचालिका प्रा.सौ.बिनादेवी कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम या मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले यांनी केले. यावेळी शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष अॅड.दिग्विजय कुराडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या स्पर्धेत 12 संघ सहभागी झाले होते. यावेळी प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.या स्पर्धेचे संयोजन प्रा.विद्या पाटील व प्रा.दर्शनी बेलेकर यांनी केले. आभार प्रा.जयवंत पाटील यांनी मानले.