शिवराज विद्या संकुलाचे संचालक प्रा.विश्वजित कुराडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी संपन्न

KolhapurLive
गडहिंग्लज :येथील शिवराज विद्या संकुलाचे संचालक प्रा.विश्वजित अनिलराव कुराडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी संपन्न झाला. या वाढदिवसानिमित निवासी मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून प्रा.पी.डी.पाटील उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम होते तर शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे, संचालिका प्रा.सौ.बिनादेवी कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा.पी.डी.पाटील, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले, प्रा.किशोर आदाटे, डॉ.अशोक मोरमारे, डॉ.महेश चौगुले आदींनी आपल्या भाषणातून प्रा.विश्वजित कुराडे यांचे अभीष्टचिंतन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन डॉ.राहुल मगदूम, ग्रंथपाल श्री संदीप कुराडे, प्रा.विक्रम शिंदे, श्री राजू जाधव, प्रा.ओमकार पाटील, प्रा.अक्षय तेलवेकर, प्रा.मंदार गुरव, प्रा.श्रीधर सावेकर, किरण कावणेकर, श्री पिंटू गवळी, श्री सुमित चौगुले आदींनी केले.

या प्रसंगी नांगनूरचे उपसरपंच विकास मोकाशी, मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री नागेश चौगुले, आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री प्रकाश माळी, श्री नितीन कांबळे, सरस्वती ऑफसेटचे श्री अतुल कोलते, श्री विक्रांत पावले, शिवराज इंग्लिश मेडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री.ए.बी.पाटील, फार्मसीचे प्राचार्य डॉ.राहुल जाधव निवासी मुकबधीर शाळेचे श्री हनमंत साठे-गुरुजी, यांच्यासह विद्या संकुलातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व स्टाफ उपस्थित होते. आभार प्रा.रवी खोत यांनी मानले.