शिवराज महाविद्यालयाच्या फूड सायन्स विभागाच्यावतीने चाय-पकोडा फेस्टिवल संपन्न

KolhapurLive
गडहिंग्लज :येथील शिवराज महाविद्यालयात फूड सायन्स विभागामार्फत चाय-पकोडा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या चाय-पकोडा प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.’ या फेस्टिवलचे उदघाटन अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले. सचिव डॉ.अनिलराव कुराडे, संचालिका प्रा.सौ.बिनादेवी कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रारंभी स्वागत प्रा.राजश्री दळवी यांनी केले. प्रा.किरण हराळे यांनी प्रास्ताविकातून या उपक्रमाची माहिती दिली.

यावेळी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये फूड इंडस्ट्रि अत्यंत गरजेची आहे. आज काळाची गरज ओळखून या क्षेत्रातून तरुण मोठी झेप घेत आहेत. या क्षेत्रात खूप संधी आहेत हे ओळखूनच फूड इंडस्ट्रीकडे वाढता कल आहे.आजच्या काळात फूड सायन्स हा अत्यंत महत्वाचा अभ्यासक्रम आहे. सद्या फूड इंडस्ट्री मोठ्या जोमाने कार्यरत असल्याचे पाहायला मिळते आहे. शिवराज महाविद्यालयाने फूड सायन्सच्या हा अभ्यासक्रम माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुरु करून या विभागातील विद्यार्थ्यांना एक वेगळीच पर्वणी उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाचा लाभ घेऊन आपले करिअर घडवावे असे प्रतिपादन केले. यावेळी महाविद्यालयाच्या परिसरात फूड सायन्सच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या बासुंदी चहा, ब्लॅक टी, पिंक टी, ब्लू टी तसेच कांदा पकोडा, मेथी पकोडा, राईस पकोडा याचा आस्वाद सर्वांनी घेतला. प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी असेच उपक्रम राबविण्यात यावेत यातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. तसेच या क्षेत्रातून विद्यार्थ्यांना आपले करिअर घडविण्याची मोठी संधी आहे. आपल्या भागातील रानमेवा व काजू सारखे फळ यावर देखील प्रक्रिया करून नवनवीन पदार्थ बनविण्याची संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

याप्रसंगी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.ए.एम.हसुरे, सरस्वती प्रिंटींग प्रेसचे श्री अतुल कोलते, प्रा.सुशांत पांगम यांच्यासह अन्य मान्यवर, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजनासाठी प्रा.राजश्री दळवी, प्रा.निकिता नाईक, प्रा.किरण हराळे, प्रा.श्वेता जाधव, डॉ.विद्या देशमुख यांनी परिश्रम घेतले. फूड सायन्स विभागप्रमुख प्रा.किशोर आदाटे यांनी सर्वांचे आभार मानले.