गडहिंग्लज : शिवराज महाविद्यालयाच्या इंग्रजी माध्यम कॉमर्स विभागाची सबेस्टीना व्हिक्टर बारदेस्कर ही विद्यार्थिनी सी.ए.परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, कॉमर्स विभाग प्रमुख डॉ.दीपक खेडकर, पदव्युत्तर समन्वयक डॉ.महेश चौगुले, प्रा.बियामा वाटंगी यांनी सबेस्टीना बारदेस्कर व त्यांचे आई-वडील यांचे अभिनंदन केले. यावेळी शिवराज विद्या संकुलाचे संचालक प्रा.विश्वजित कुराडे, राजेंद्र देसाई यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते.