गडहिंग्लज : येथील शिवराज विद्या संकुलात शिवराज महाविद्यालयाच्या ६१ वा वर्धापन दिन’ व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे यांनी केले. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज व कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांनी राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या संस्थानाध्ये सुरु केलेल्या सामाजीक आणि शैक्षणिक चळवळीला आकार दिला. त्यामुळे गोरगरिबांची मुले खऱ्याअर्थी शिकू लागली. राजर्षी शाहू महाराज व कर्मवीर विठठल रामजी शिंदे यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन ‘शिवराज’ची स्थापना झाली आहे. महाविद्यालयाच्या ६१ व्या वर्धापन दिनाच्या औचित्याने समाजातील सर्व घटकांना सामावून घेऊन विविध उपक्रम राबविण्यात येणार असे प्रतिपादन शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांनी केले. आज महाविद्यालयाचा ६१ वा वर्धापन दिन व शाहू महाराज यांची जयंती हा ऐतिहासिक योगायोग म्हणावा लागेल. आजही हे महाविद्यालय आपल्या परीने बहुमोल असे योगदान देत आहे. या संस्थेने राजर्षी शाहू महाराज व कर्मवीर विठठल रामजी शिंदे यांच्या कार्याचा वारसा आजही जपला आहे. गोरगरीब समाजासाठी त्यांनी पेरलेला सामाजीक विचार घेऊन आमच्या संस्थेची वाटचाल सुरु आहे. असेही शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांनी स्पष्ट केले. शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांनी कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ६० वर्षापूर्वी सुरु झालेल्या या शिवराज महाविद्यालयाने हजारो विद्यार्थी घडविले आहेत. या महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या योगदानाचे सिंहावलोकन करताना - संस्थेच्या माध्यमातून बहुजनांची मुले शिकावीत या उद्देशाने हे महाविद्यालय स्थापन करण्यात आले आहे. यासाठी अनेकांनी आप-आपल्या परीने योगदान दिले आहे. समाजाची गरज ओळखून विविध अभ्यासक्रमाची सोय करण्यात येत आहे. शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील अग्रेसर असे शिवराज महाविद्यालय आपल्या कार्यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आजही योगदान देत आहे अनेक विद्यार्थी घडवीत आहेत याचा सार्थ अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महाविद्यालयाचे कर्तृत्ववान माजी विद्यार्थी मुख्याध्यापक यशवंत बांदेकर, प्रा.एम.डी.कदम(हंदेवाडी), कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्था चेअरमन श्री सचिन शिंदे (नूल)टी.एस.देसाई (ऐनापूर), प्रा.सुभाष शिरकोळे आदींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सत्कारमूर्ती माजी विद्यार्थी यशवंत बांदेकर, प्रा.एम.डी.कदम(हंदेवाडी), श्री सचिन शिंदे, श्री राहुल शिरकोळे यांनी आपल्या भाषणातून शिवराज महाविद्यालय त्याकाळी खडतर परिस्थितीतून शिकणाऱ्या आम्हा विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे होते. शिवराजमुळे आम्ही खऱ्याअर्थी घडलो आहोत. आजही हे महाविद्यालय समाजातील ग्रामीण विद्यार्थ्यांचा आधार बनला आहे. या महाविद्यालयाने घेतलेली झेप ही खरोखरच आजही प्रेरणादायी आहे असे स्पष्ट करून आपल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी या भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानार्जानातून ऑक्सिजन देण्याचे कार्य करीत आहे. या भागातील विद्यार्थी घडावेत यासाठी आमचे आजही महाविद्यालयाच्या माध्यमातून प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. या कार्यक्रमानिमित्त महाविद्यालयाच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संचालक श्री श्रीरंग उर्फ पापा चौगुले, प्रा.विश्वजित कुराडे, ग्रंथपाल श्री संदीप कुराडे, हिंदी विभाग प्रमुख डॉ.एन.बी.इकिले यांच्यासह संस्थेचे अन्य पदाधिकारी, विद्या संकुलातील प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अशोक मोरमारे यांनी केले तर आभार उपप्राचार्य प्रा.तानाजी चौगुले यांनी मानले.