आजरा : सालाबादप्रमाणे पं. दिनदयाळ विद्यालय आजरा येथे कै.भूषण गुंजाळ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संवेदना भूषण टिम प्रमुख श्री. संजय हरेर होते तर प्रमुख पाहुणे श्री परशुराम बामणे, अध्यक्ष अन्याय निवारण समिती आजरा व श्री. संजीव देसाई मुख्याध्यापक दिनदयाळ विद्यालय आजरा यांची होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.तानाजी पावले सर यांनी करून संवेदना कार्याचा आढावा दिला. कै. भूषण गुंजाळ स्मृतिदिनानिमित्य भूषण गुंजाळ मित्र मंडळ व संवेदना फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आजरा तालुक्यातील आई वडिल दोन्हीही हयात नसलेल्या इ. १ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक व नित्योपयोगी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये १७ अनाथ विद्यार्थ्यांना साहित्य वाटप व मोफत वैद्यकिय आरोग्य तपासणी , औषधोपचार संवेदना डॉक्टर टीम व मेडिकल असोसिएशन आजरा यांच्या मार्फत करण्यात आले. आतापर्यंत हा कार्यक्रम आजरा तालुका मर्यादित होता. मात्र चालू वर्षापासून अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आजरा तालुक्याबरोबरच चंदगड, गडहिंग्लज व भुदरगड याही तालुक्यामध्ये राबविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी गडहिंग्लज तालुका संवेदना प्रतिनिधी श्री. एम. ए. पाटील सर तसेच चंदगड संवेदना प्रतिनिधी श्री. अजित गणाचारी व श्री. गोपाळ गडकरी श्री सुधीरभाऊ कुंभार संचालक, दिनदयाळ विद्यालय, संवेदना सदस्य श्री. कृष्णा खाडे सर, श्री. जीवन आजगेकर सर, अन्याय निवारण समितीचे सर्व सदस्य, पालक ,विद्यार्थी उपास्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री तानाजी पावले सर यांनी केले तर आभार प्रदर्शन संवेदना सचिव श्री.संतराम केसरकर यांनी केले