रविवारी नविद मुश्रीफ यांचा सत्कार
गडहिंग्लज : बांधकाम कामगारांना संसारोपयोगी भांडी संच वाटप कार्यक्रम व नविद मुश्रीफ यांची गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रविवार (दि. १५) सकाळी १० वा. बॅरिस्टर नाथ. पै विद्यालय येथे गडहिंग्लजकरांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत बांधकाम कामगारांना संसारोपयोगी भांडी संच वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमार्फत करण्यात आले आहे. कार्यक्रमानंतर नविद मुश्रीफ सत्कार स्वीकारणार आहेत.