सध्या सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अहमादाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं आहे. विमान कोसळल्यानंतर काही व्हिडीओ समोर आले आहेत. व्हिडीओमध्ये फक्त धुराचे लोट दिसत आहेत. धुराचे लोट पाहून विमानाला मोठा अपघात झाला असावा, असा अंदाज लावला जात आहे. अद्याप मात्र नेमकी जीवितहानी झाली का? याची माहिती मिळालेली नाही. हे विमान टेक ऑफ करतानाच कोसळलं असल्याचं बोललं जातंय. या विमानत एकूण 242 प्रवासी होते, असं सांगितलं जातंय. हे विमान लंडनला जात होतं. मात्र त्याआधीच या विमानाचा अपघात झाला.
अहमदाबादमधील मेघानी इथं हे विमान कोसळलं आहे. विमान कोसळण्याचं नेमकं कारण काय आहे? हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही दुर्घटना झाली असावी, असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. सध्या या परिसरात फक्त धुराचे लोट दिसत आहेत. त्यामुळे विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली असावी, असाही अंदाज लावला जात आहे.