गडहिंग्लज :येथील शिवराज विद्या संकुलामध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाविद्यालय परिसरात प्रा.सौ.पौर्णिमा कुराडे व विना-अनुदानित ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा.संदीप कुराडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रारंभी प्रा.श्रीदेवी गाडवी-साखरे यांनी स्वागत करून प्रास्ताविकामध्ये आज जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नव्या पिढीला वृक्षारोपणाची का गरज आहे ? याचे महत्व त्यांनी सांगितले. जांभूळ, आवळा, करंज, वड यासह विविध प्रकारची रोपे लावण्यात आली. संस्थेचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे, संचालिका प्रा.सौ.बिनादेवी कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी एन.एस.एस.प्रमुख प्रा.संजय कांबळे, प्रा.तानाजी भांदुगरे, प्रा.स्वप्नील आर्दाळकर, प्रा.गीतादेवी देसाई, प्रा.प्रियांका जाधव यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. प्रा.सुनिता देसाई यांनी उपस्थितांचे आभार मानले.