सर, भारतात या की, सोबत मिळून आनंद…” RCB च्या विजयानंतर SBI ने अशी घेतली विजय माल्याची फिरकी!

KolhapurLive

कर्जबुडव्या आणि फरार उद्योगपती विजय माल्याची स्टेट बँक ऑफ इंडियाने चांगलीच फिरकी घेतली आहे. विराट कोहलीच्या RCB ने आयपीएल 2025 चा किताब पटकावला. त्यावर विजय माल्याने ट्वीट करत शुभेच्छा दिल्या होत्या.

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 18 व्या हंगामाचा किताब रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) पटकावला. उत्साहाच्या भरात कर्जबुडव्या आणि फरार उद्योगपती विजय माल्याने सोशल प्लॅटफॉर्म एक्सवर ट्वीट केले. त्याने आरसीबीला विजयाच्या शुभेच्छा दिल्या. त्याच्या या पोस्टवर भारतीय स्टेट बँकेने (SBI) त्याची चांगलीच फिरकी घेतली. तर इतर युझर्सने त्याला ट्रोल केले. त्याची या समाज माध्यमावर यथेच्छ धुलाई करण्यात आली. विजय माल्या हा आरसीबीचा एकेकाळी मालक होता. त्यानेच ही फ्रॅचाईजी सुरू केली होती. बँकांना चुना लावून, कोट्यवधींचे कर्ज बुडवून माल्या परदेशात पळाला आहे. त्याने एसबीआयसह इतर बँकांचे जवळपास 9 हजार कोटी रुपये बुडवले आहेत. तो सध्या लंडनमध्ये राहतो. त्याने एक्सवर केलेल्या ताज्या पोस्टमुळे तो ट्रोल झाला आहे. अनेक युझर्सने त्याला योग्य शब्दात त्याची लायकी दाखवून दिली आहे.