गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयाने २०१८-२५ या शैक्षणिक वर्षात शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता शिष्यवृत्ती मध्ये विज्ञान विद्याशाखेत निमशहरी गटात प्रथम क्रमांक पटकाविणारा सलग पाचव्यांदा संधी महाविद्यालयाला संधी प्राप्त झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ.एस.एम.कदम व संस्था सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांनी दिली. ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर करिअरच्या संधी देण्यात आमचे महाविद्यालय नेहमीच अग्रेसर आहे. महाविद्यालयाने सलग पाच वर्षे हा बहुमान पटकाविला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडविणारे महाविद्यालय म्हणून शिवराज महाविद्यालयाने आपलेपण जपले आहे. संस्था अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांच्या मार्गदर्शनाने आमच्या महाविद्यालयात विविध उपक्रमशील व कौशल्यपूर्ण शिक्षणाच्या योजना राबविण्यासाठी आम्ही धडपडत आहोत. या प्रयत्नाला यश मिळत आहे. महाविद्यालयातील पारंपारिक व व्यावसायिक शिक्षणाचा लाभ या उपविभागातील आणि सीमाभागातील विद्यार्थ्यांनी घ्यावा या उद्देशाने शिवराज महाविद्यालयाचा हा ‘ज्ञानरथ’ पुढे वाटचालीत करीत आहे. ‘शिवराज’च्या माध्यमातून ज्ञानदानाचे कार्य करीत ग्रामीण विद्यार्थ्यांशी ऋणानुबंध जपले जात आहे. शिवाय महाविद्यालयात अधिका-अधिक विद्यार्थी शिकावेत व प्लेसमेंट विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी अनेक नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांशी महाविद्यालयाने सामंजस्य करार केलेले आहेत. यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिल कुराडे यांनी सांगितले. प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी शिवराज महाविद्यालयाच्या सायन्स विभागाला हा बहुमान मिळाला आहे. त्यामुळे आमच्या भागातील विद्यार्थ्यांना शिवराज महाविद्यालयाने घडविण्यासाठी दिलेल्या बहुमोल योगदानाचे खऱ्याअर्थी फलित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.हा बहुमान महाविद्यालयाच्या विविध शाखांना मिळावा यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील राहून गुणवत्ता शिष्यवृत्तीत अव्वल ठरण्यासाठी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा कणा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न शिवराज महाविद्यालयाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे प्राचार्य डॉ.कदम यांनी स्पष्ट केले.