गडहिंग्लज :ग्रामीण विद्यार्थ्यांना अॅनिमेशनमध्ये विविध क्षेत्रात करिअर करण्यासाठी संधी उपलब्ध व्हावी व अॅनिमेशनमध्ये पदवी शिक्षण घेऊन करिअरच्या क्षेत्रात झेप घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची गरज ओळखून शिवराज विद्या संकुलामध्ये सुरु करण्यात आलेल्या बी.एस्सी.(अॅनिमेशन) या पदवी अभ्यासक्रमात ‘शिवराज’ चा विद्यार्थी अधिक सक्षम व्हावा यासाठी विद्या संकुलाने सौ.शिल्पा सिन्हा यांच्या रेलीश इन्फोसॉफ्ट अॅनिमेशन आणि मिडीया कोल्हापूर या संस्थेशी सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांनी दिली. या सामंजस्य करारामध्ये शिवराज विद्या संकुलाच्या विद्यार्थ्यांना अॅनिमेशन क्षेत्रात आवश्यक असे वेब डिझाईन, थ्री-डी अॅनिमेशन, ग्राफिक्स, व्ही.एफ.एक्स.,गेमिंग यासह अन्य अॅडव्हान्स कोर्सेस शिकविण्यात येणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण व प्लेसमेंटची सोय उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती रेलीश इन्फोसॉफ्ट अॅनिमेशन आणि मिडीयाच्यावतीने शाखा प्रमुख श्री अमृत ओतारी यांनी दिली. अॅनिमेशन क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना आता शिवराज विद्या संकुलामध्ये शिकण्याची ही संधी उपलब्ध आहे. या संधीचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी केले. अॅनिमेशनमध्ये पदवी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना मिडिया आणि इंटरटेनमेंट, चित्रपट इंडस्ट्री, कार्टून निर्मिती, सिरियल्स, मार्केटिंग व जाहिरात, वेब व ए.आय., आय.टी., इंटेरिअर आर्कीटेक्चर, प्रिंटींग आणि डिजिटल मिडिया यासह विविध क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ घेण्यासाठी अॅनिमेशन क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिवराजमध्ये बी.एस्सी. (अॅनिमेशन) साठी प्रवेश घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात अॅनिमेशन विभाग प्रमुख प्रा.बी.एस.पठाण -९८२२४११४३१ यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधावा.