गडहिंग्लज :
येथील शिवराज महाविद्यालयात पद्मश्री अरण्ऋषी मारुती चितमपल्ली यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. पद्मश्री अरण्ऋषी मारुती चितमपल्ली यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. पक्षीशास्त्रज्ञ आणि वन्यजीव अभ्यासक असलेले पद्मश्री चितमपल्ली यांचे अभयारण्य विकासात मोलाचे योगदान होते. त्यांच्या या योगदानाची आजच्या पिढीला ओळख होणे गरजेची आहे. कारण मानवाची निसर्गावरची अनास्था लक्षात घेता अशा थोर व्यक्तिमत्वाचे योगदान देशाला मोलाचे ठरत आहे. अशा या थोर व्यक्तीच्या श्रद्धांजली समारंभात शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी निसर्गप्रेमी श्री अनंत पाटील यांनी गडहिंग्लज आणि चित्तमपल्ली यांच्या संबधाचा आढावा घेऊन चित्तमपल्ली यांचे पर्यावरणातील योगदान यावर उजाळा दिला. तसेच प्राचार्य डॉ.एस,एम.कदम यांनी चित्तमपल्ली यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. या शोकसभेचे नियोजन प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.किशोर आदाटे व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.ए.जी.हारदारे यांनी केले. यावेळी डॉ.राहुल मगदूम, डॉ.जी.जी.गायकवाड, डॉ.एन.बी.इकीले, प्रा.डी.यु.जाधव यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.