शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिल कुराडे यांचा वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

KolhapurLive
गडहिंग्लज : शिवराज विद्या संकुलामध्ये शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांचा वाढदिवसानिमित अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला. अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नुलच्या रामनाथगिरी मठाचे भगवानगिरी महाराज उपस्थित होते. यावेळी जे. पी. नाईक सभागृहात बसविण्यात आलेल्या ए. सी. चे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात डॉ. अनिलराव कुराडे यांचा सत्कार प्रमुख अतिथी रामनाथगिरी मठाचे भगवानगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.

 प्रमुख अतिथी सुरगीश्वर मठाचे गुरुसिद्धेश्वर महास्वामी यांनी आपल्या शुभेच्छातून डॉ.अनिलराव कुराडे ही ज्ञानशक्ती आहे. त्यांनी ज्ञानाच्या पवित्र कार्यातून अनेकांना घडविले आहे. आणि विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनाची दिशा दाखविली आहे. त्यांच्या वाटचालीला अधिक बळ मिळावे असे स्पष्ट करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. रामनाथगिरी मठाचे भगवानगिरी महाराज यांनी आपल्या शुभेच्छातून डॉ.अनिलराव कुराडे यांनी केलेल्या कार्यातून समाजासाठी दिलेले योगदान मोलाचे आहे. असेच कार्य त्यांच्या हातून घडत राहो त्यांच्या कार्याला अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये आम्ही जन्माला आल्याचे सार्थक ठरविण्याचे कार्य करीत आलो आहोत. पुढच्या पिढीनेही असेच कार्य करावे हेच आम्हाला अपेक्षित आहे. मिळणाऱ्या संधीतून समाज हिताचे कार्य सतत घडत राहो ही सदिच्छा प्रा. किसनराव कुराडे यांनी व्यक्त केली.

सत्कारमूर्ती डॉ. अनिलराव कुराडे यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना- समाज घडविणारी ज्ञानसंस्था यशस्वीपणे चालवून दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण सर्वांनी माझ्या कार्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या संस्था समाजासाठी चालविण्यात येत आहे. याचा सार्थ अभिमान वाटतो. आपल्या सर्वांच्या कृपाआशिर्वादामुळे यशस्वी ठरण्याचा प्रयत्न करीत असल्याचे डॉ. कुराडे यांनी सांगितले. यावेळी जि.प.सदस्य अॅड. हेमंत कोलेकर, ओंकार शिक्षण मंडळाचे राजन पेडणेकर, डॉ. सुधीर मुंज, बसवराज आजरी, एम. के. सुतार, मुख्याध्यापक श्री ए. बी. पाटील, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, प्राचार्य दत्ता पाटील, अजित चोथे आदींची शुभेच्छापर भाषणे झाली.

या अभिष्टचिंतन सोहळ्यास उपाध्यक्ष श्री के.जी.पाटील, अॅड. दिग्विजय कुराडे, प्रा.विश्वजित कुराडे, विशाखा कुराडे, साखर कारखाना चेअरमन प्रकाश पत्ताडे, सतीश इटी, राजू मांडेकर, रमेश रिंगणे, श्री नंदनवाडे गुरुजी, के.व्ही.पेडणेकर, प्रा. सौ.बिनादेवी कुराडे, वसंतराव यमगेकर, नागेश चौगुले, सिद्धार्थ बन्ने, घुगरी आण्णा, राजगोंड पाटील, उदय जोशी, सोळांकूर कॉलेजचे प्रा.लगाडे, राजशेखर येरटे, बाबासाहेब पाटील, सोमगोंडा आरबोळे, रमेश आरबोळे, मल्लिकार्जुन आरबोळे, अरविंद बारदेस्कर, तानाजी कुराडे, इकबाल अत्तार, सादिक लमतुरे, बाळू पोतदार, चंद्रकांत जांगनुरे, ऐनापुरचे माजी सरपंच ईश्वर देसाई, बाळ पोटे-पाटील, बाबू बसाण, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विद्या संकुलातील प्रा.विक्रम शिंदे, पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले, ग्रंथपाल श्री संदीप कुराडे, रजिष्ट्रार डॉ संतोष शहापूरकर सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. अशोक मोरमारे यांनी सूत्रसंचालन केले.