मुंबई : आताच्या घडीची सर्वात मोठी समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या संबंधांमुळे बीसीसीआयने Ipl 2025 Suspension करण्याचा निर्यण घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव गुरूवारचा पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समधील सामना रद्द करण्यात आला होता. त्यामुळे त्यानंतर आयपीएलचे सामने होणार की नाहीत असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र आता BCCIने सर्व संघ मालकांसोबत चर्चा करून आयपीएल तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी, पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स सामना रद्द करण्यात आला होता. सुरक्षेच्या कारणांमुळे ब्लॅकआऊटची घोषणा करण्यात आली होती. प्रेक्षकांना तातडीने स्टेडियममधून बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे पुढील सामना होणार की नाही याबाबत साशंकता होती.
तणावामुळे पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील धर्मशाला येथे खेळवला जाणारा सामना आधीच अहमदाबादला हलवण्यात आला होता. मात्र आता आयपीएलचे पुढील सामने तूर्तास खेळवले जाणार नाहीत. IPL 2025 चे आतापर्यंत ५७ सामने झाले असून १६ सामने बाकी आहेत. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समधील सामना रद्द करण्यात आला होता. त्यामुळे आज होणारा आरसीबी आणि लखनऊनमधील सामना होणार की नाही याबाबत शंका होती. मात्र आता बीसीसीआयने घेतलेल्या निर्णयामुळे संपूर्ण आयपीएल स्पर्धा तूर्तास थांबवण्यात आली आहे.