शिवराजमध्ये रविवार ४ मे रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

KolhapurLive
गडहिंग्लज :येथील शिवराज महाविद्यालयात शिवराज विद्या संकुलाचे सचिव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि. ४ मे रोजी सकाळी नऊ वाजता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये वॉलस्टार टेक्नोलॉजी, मॅनकाइंड फार्मा, मायक्रो लॅब, अॅडीको इंडिया, संपुर्णम इन्फोटेक, एस्टीम (हार्कोस), शिल्पा बायोलॉजीकल्स यांसह ३० हून अधिक नामवंत कंपन्या सहभागी होणार आहेत. या भव्य मेळाव्यात रसायनशास्त्र, फार्मसी, कॉम्प्यूटर सायन्स, सूक्ष्मजीवशास्त्र, आय.टी., बी.बी. ए., बी.सी.ए., यासह अन्य विविध विषयातील पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना कँपस इंटरव्हूव्दारे संधी उपलब्ध होणार आहेत. या मेळाव्यामध्ये सहभागी झालेल्या इच्छुकांचे मोफत रजिस्ट्रेशन करण्यात येणार आहे. तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कार्यस्थळी नेमणूक पत्र देण्यात येणार आहे. तरी या उपविभागातील इच्छुकांनी या भव्य रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी व्हावे व रोजगाराची संधी प्राप्त करावी असे आवाहन प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी केले आहे. या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या इच्छुकांनी https://forms.gle/9phqjT7tWmWpvxjL8 या लिंकवर रजिस्ट्रेशन करावे तसेच अधिक माहितीसाठी समन्वयक प्रा.विश्वजित कुराडे, सहसमन्वयक प्रा.विक्रम शिंदे व प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा.नितीन चव्हाण यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधावा.