गडहिंग्लज : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थी हिताचे आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात याचा समावेश करण्यात आले आहे असे प्रतिपादन आजरा महाविद्यालयाचे डॉ.के.जी.पोतदार यांनी केले. येथील शिवराज महाविद्यालयात ‘स्कूल कनेक्ट (एनईपी कनेक्ट) अभियान’ अंतर्गत शिवराज महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाच्या संचालिका प्रा.सौ.बिनादेवी कुराडे होत्या. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रा.किशोर आदाटे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय डॉ.ए.एम.हसुरे यांनी करून दिला. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ.के.जी.पोतदार म्हणाले- राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची रूपरेषा व महत्व विद्यार्थ्यांना समजून सांगितले. या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या करिअरला संधी मिळावी तसेच विद्यार्थी स्वयंपूर्ण व्हावा यासाठी यु.जी.सी.मार्फत हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन आपले करिअर घडविण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी संचालिका प्रा.सौ.बिनादेवी कुराडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले, डॉ.प्रवीण डोंगरे, डॉ.अल्ताफ नाईकवडे, प्रा.विकी शिंदे, डॉ.नीलम दिघे यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रा.गौरव पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रा.निळकंठ भोसले यांनी सर्वांचे आभार मानले.