गडहिंग्लज :येथील शिवराज महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडामहोत्सवास प्रारंभ करण्यात आला. महाविद्यालयाच्या ग्राउंडवर या क्रिडा महोत्सवाचे उदघाटन महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी विशाखा कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम होते. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय कुस्तीपटू रोहन रंडे तर शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष अॅड.दिग्विजय कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या उदघाटन प्रसंगी विशाखा कुराडे, राष्ट्रीय कुस्तीपटू रोहन रंडे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक पटकाविलेले महाविद्यालयाचे खेळाडू सुकन्या शिवणे, मेघना मोहिते, ऋतिक वर्मा यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे व प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनीही खेळाडूंना मार्गदर्शन केले. स्वागत व प्रास्ताविक क्रीडा शिक्षक प्रा.जयवंत पाटील यांनी केले. पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले, प्रा.विश्वजित कुराडे, प्रा.मंदार गुरव, प्रा.साहिल समडोळे, प्रा.संतोष पाटील, प्रा.तानाजी भांदूगरे, प्रा.एस.ए.जांगनूरे यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व खेळाडू उपस्थित होते. प्रा.गौरव पाटील यांनी सूत्रसंचालन केले. क्रिडाविभाग प्रमुख डॉ.राहुल मगदूम यांनी आभार मानले.