गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात पदार्थविज्ञान व बी.एस्सी कॉम्प्यूटर सायन्स एंटायर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने आयोजित ‘आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेनेचे संस्थापक हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम होते. प्रारंभी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन अक्षर भारत वाचनालयाचे संस्थापक श्री सुरेश पोवार यांच्या हस्ते तर शिवसेनेचे संस्थापक हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन शिवराज विद्या संकुलाच्या संचालिका प्रा.सौ.बिनादेवी कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे, श्री सुरेश पोवार, डॉ.आर.पी.हेंडगे, प्रा.गौरव पाटील यांनी आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनकार्याबाबत सविस्तर माहिती देऊन मागर्दर्शन केले. या कार्यक्रमास पर्यवेक्षक प्रा.टी.व्ही.चौगुले, ग्रंथपाल श्री संदीप कुराडे, यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा. रवी खोत यांनी केले. तर प्रवीण सरनोबत यांनी आभार मानले.