गडहिंग्लज : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष महेश सलवादे यांची गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय रुग्णकल्याण समिती सदस्यपदी फेरनिवड करण्यात आली आहे. त्यांना आमदार नियुक्त प्रतिनिधी म्हणून वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्र दिले आहे.
सलवादे यांनी आपल्या कार्यकाळात मिळालेल्या पदाचा सर्वसामान्यांसाठी योग्य तो वापर करून अनेकांना आधार दिला. प्रशासनाशी समन्वय ठेवून अनेक प्रलंबित प्रश्न मंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून मार्गी लावण्यात यशस्वी ठरले. या कामाची पोचपावती म्हणून रुग्णकल्याण समिती सदस्यपदी त्यांची दुसऱ्यांदा निवड करण्यातआली आहे.
मंत्री मुश्रीफ यांनी उपजिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन मशीन, बोअरवेल, कोविड काळात महाराष्ट्रातील पहिल्या ऑक्सिजन प्लान्टची उभारणी करून कित्येक रुग्णांना आधार, सोयी-सुविधा दिल्या. येत्या काळात मंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून येथील खाटांची संख्या वाढवून रुग्णांना जलदगतीने सेवा देण्याचा मानस तसेच एमआरआय मशीन पूर्तता करणार असल्याचे सलवादे यांनी सांगितले. निवडीसाठी किरण कदम, सुरेश कोळकी, रामगोंड पाटील, अमर मांगले, वसंत यमगेकर, सिद्धार्थ बन्ने, हारुण सय्यद, राजू खणगावे यांचे सहकार्य लाभले.