सावित्रीबाई फुलेंचा विचार पुढे नेण्याचा निर्धार सावित्रीबाई महिला किडा संघटनेतर्फे अभिवादन

KolhapurLive
गडहिंग्लजः येथील सावित्रीबाई महिला किड़ा संघटनेतर्फे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शिवशाहू शिक्षक कर्मचारी पतसंस्थेच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. अक्षदा गुंडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. श्रीमती. उर्मिला कदम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सौ. उज्वला दळवी म्हणाल्या सावित्रीबाई फूले यांनी सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रात आव्हानात्मक स्थितीत केलेले कार्य आजच्या सर्व क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना नेहमीचे प्रेरणा देत आले आहेत. त्यांचा विचार कृतीशिलतेने अंमलात आणण्यासाठी सातत्याने कार्यरत राहण्याची गरज आहे. प्राचार्य. साताप्पा कांबळे यांनी सावित्रीबाई फुले यांनी दिलेला विचार आणि समाजासाठी केलेले कार्य खूप महत्वाचे आहे. त्याचा आदर्श आपल्यासमोर ठेवून आपापल्या कुवतीप्रमाणे महिलांनी कार्यरत रहावे. आज सामाजिक क्षेत्रात कमालीची अस्वस्थता असली तरी महिला आत्मविश्वासाने विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. महिलावरील अत्याचारचे प्रमाण वाढत आहेत. त्याविरोधात लढण्यासाठी संघटीतरित्या प्रयत्नाची गरज आहे. अक्षदा गुंडे यांनीही मनोगत व्यक्त केले. गीता पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमास शारदा आजळकर, सुवर्णलत्ता गोईलकर, सुमन सावंत, वासंती कांबळे, माया पाटील, वसुंधरा सावंत, छाया इंगळे, बाळासाहेब शिंदे, रवि कोंडूसकर इ. उपस्थित होते.