विद्यार्थ्यांवर श्रम व संस्काराची रुजवण झाली पाहिजे.तहसीलदार श्री ऋषिकेत शेळके

KolhapurLive
शेंद्री येथे संभाजीराव माने ज्युनिअर चे एन.एस.एस.चे विशेष श्रमसंस्कार शिबिरास प्रारंभ.
एन.एस.एस.शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर श्रम व संस्काराची रुजवण झाली पाहिजे. असे प्रतिपादन तहसीलदार श्री ऋषिकेत शेळके यांनी केले. शेंद्री येथे आयोजित संभाजीराव माने ज्युनिअर चे एन.एस.एस.चे विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तहसीलदार श्री शेळके पुढे म्हणाले- श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांना घडण्याची संधी प्राप्त होते. विद्यार्थ्यांना एक प्रकारची शिस्त मिळते. ही शिस्त विद्यार्थ्यांना जीवनात अत्यंत मोलाची ठरते. त्यामुळे विद्यार्थ्यानी श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून मिळणाऱ्या संस्कारातून आपले जीवन घडवावे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून आजच्या विद्यार्थ्यांना श्रमसंस्काराचे महत्व वेळीच कळले पाहिजे. श्रमसंस्काराची ताकद जीवनात किती महत्वाची आहे. हे विद्यार्थ्यांना समजले पाहिजे यासाठी अशा उपक्रमांची खरी गरज आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच संजय राऊत, सुदर्शन बाबर, रविंद्र पोवार, आण्णासो सावंत, आनंदा तोडकर, दयानंद तोडकर, दिनकर सावंत, रामा सावंत, प्रसाद नलवडे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्वं पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ, तसेच एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा.संजय कांबळे, प्रा.सीमा कांबळे, विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले यांनी केले. प्रा.आशा पाटील यांनी सुत्रसंचालन केले तर प्रा.आर.डी.मिसाळ यांनी आभार मानले.