गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात नांदी फौंडेशन व महिंद्रा प्राईड क्लास रूम महिला सबलीकरण व कौशल्य विकास कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांची उपस्थिती लाभली. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा.एन.जी.चव्हाण यांनी केले. या कार्यशाळेचे उदघाटन शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे व संचालिका प्रा. बिनादेवी कुराडेयांच्या हस्ते करण्यात आले. २१ दिवस चाललेल्या या कार्यशाळेत नांदी फौंडेशनचे राष्ट्रीय प्रशिक्षक हकीम लकडीवाला व रजत वराडे हे जॉब प्लेसमेंटसाठी आवश्यक अशी कौशल्य विकसित करण्यासाठी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. यावेळी शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांनी असे प्रशिक्षण व्यक्तिमत्व विकास व कौशल्यपूर्ण ज्ञानासाठी काळाची गरज आहे. याचा दैनंदिन जीवनात सुद्धा व्यक्तीच्या जीवनावर प्रभाव पडतो. त्यामुळे आपल्या वागण्या-बोलण्यामध्ये आमुलाग्र बदल घडून येतो. असे उपक्रम केवळ नोकरीच्या दृष्टीने न राबविता व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. म्हणून अशा उपक्रमांची गरज म्हणून महाविद्यालयात राबविण्यात येत असल्याची त्यांनी सांगितले. यावेळी अॅकेडेमिक प्रमुख प्रा.के.एस.देसाई, प्रा.आर.डी.कमते, प्रा.रवी खोत, प्रा.रमेश पाटील, प्रा.विक्रम शिंदे आदी उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये बी.कॉम आय.टी., बी.सी.ए., बी.बी.ए, बी.सी.एस.व बी.एस्सी. कॉम्प्यूटर सायन्सचे ३०० विद्यार्थिनी सहभागी होते. प्रा.रोमा फर्नांडीस यांनी आभार मानले.