गडहिंग्लज :हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे.हिंदी भाषेचे महत्व सर्वांनी समजून घेतले पाहिजे. आजही आपल्या राष्ट्रभाषेकडे दुर्लक्ष केले जात आहे. अन्य भाषेंच्याबरोबर हिंदी भाषा आणि हिंदी साहित्य समजून घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ओंकार कॉलेजच्या डॉ.संजीवनी पाटील यांनी केले. येथील शिवराज महाविद्यालय ग्रंथालय, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा विभाग, वाड्मय मंडळ व ओंकार महाविद्यालय यांच्यावतीने संयुक्त विद्यमाने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत ‘वाचन पंधरवडा’ कार्यक्रमात विश्व हिंदी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम होते. तर शिवराज विद्या संकुलाचे संचालिका प्रा.सौ.बिनादेवी कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी डॉ.संजीवनी पाटील यांची प्रोफेसरपदी निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ.कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विद्या संकुलाचे संचालिका प्रा.सौ.बिनादेवी कुराडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले, प्रा.एम.एस.घस्ती, प्रा.डी.यु.जाधव, प्रा.आझाद पटेल, प्रा.अजित केसरकर यांच्यासह शिवराज महाविद्यालय व ओंकार महाविद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनीनी शेर-शायरी व गझल सादर करून या कार्यक्रमाला रंगत आणली. यावेळी ग्रंथालय विभागाच्यावतीने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत ‘वाचन पंधरवडा’ कार्यक्रमात विश्व हिंदी दिनानिमित्त ‘हिंदी भाषा व साहित्य’ या विषयावर आयोजित ग्रंथ-प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात हिंदी विभाग प्रमुख डॉ.एन.बी.इकिले स्वागत करून प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. यावेळी ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाचे समन्वयक ग्रंथपाल श्री संदीप कुराडे, प्रा.पौर्णिमा कुराडे, यांच्यासह अन्य प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.एस.बी.माने यांनी केले.