शिवराज महाविद्यालयात ‘राष्ट्रीय मतदार दिन’ संपन्न

KolhapurLive

गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्यावतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जागृती कार्यक्रम संपन्न झाला. स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले यांनी केले. गडहिंग्लजचे तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी विद्यार्थ्यांना मतदार जागृतीची प्रतिज्ञा दिली. यावेळी तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी मतदानाचा अधिकार हा बहुमोल अधिकार आहे. हा हक्क कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता बजाविले पाहिजे. यावेळी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले. शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांनी आपल्या मार्गदर्शनात आपल्या देशाची लोकशाही प्रबळ करण्यासाठी सर्वांनी मतदान प्रक्रियेत सहभागी झाले पाहिजे. मतदारांनी मतदानाचा हक्क प्रामुख्याने बजाविला पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले. प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

तसेच राष्ट्रीय राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेतील विजेते कोमल चौगुले, आदिती निकम, मिताली पाटील यांना अनुक्रमे प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांक पटकाविल्याबद्दल तहसीलदार श्री शेळके यांच्या प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘मतदार दिनाचे महत्व’ या विषयावरील भित्तीपत्रकाचे उदघाटन संस्थेचे तहसीलदार ऋषिकेत शेळके व सचिव डॉ.अनिल कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उत्कृष्ठ मतदान अधिकारी म्हणून कार्य बजाविलेले प्रवीण कदम, अभिजित लोकरे यांचा प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी नवमतदारांचे प्रातिनिधिक स्वरुपात मतदार कार्ड मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे, नायब तहसीलदार श्री शेख, श्री यादव यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. डॉ.ए.जी.हारदारे, प्रा.संजय खोत, प्रा.स्वप्नील आर्दाळकर यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.